*ऊर्जा समितीच्या खासदारांची चेन्नई येथे बैठक संपन्न*

22

*ऊर्जा समितीच्या खासदारांची चेन्नई येथे बैठक संपन्न*

 

*गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात हायड्रो विद्युत प्रकल्प सुरु करण्याची खासदार डॉ. किरसाण यांची मागणी*

 

गडचिरोली :: गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान हे ऊर्जा कमिटीच्या खासदारांसह चेन्नई येथे अभ्यास दौऱ्यावर असून चेन्नई (तामिलनाडु) येथे ऊर्जा विभागाच्या संसदीय स्थायी समितीची बैठक समिती अध्यक्ष श्रीरंग अप्पा बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली. सदर बैठकीत खासदार व समिती सदस्य डॉ. किरसान यांनी गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्रात हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट व सोलर इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट प्राथमिकतेच्या आधारावर किंवा प्रायोगिक तत्वावर स्थापित करावेत अशी मागणी समितीपुढे केली.  ऊर्जा कमिटीच्या समतीने सोलर पॉवर प्लॉन्टची मागणी तत्वतः मान्य केली असून या बैठकीस महाराष्ट्रातील ऊर्जा कमिटीचे सदस्य तथा खासदार छत्रपती साहू महाराज कोल्हापूर, खासदार शामकुमार बर्वे रामटेक, खासदार शिवाजी काळगे लातूर व इतर सदस्य खासदार उपस्थित राहून विविध विषयवार प्रश्न उपस्थित करुन सल्ले दिले.