गार्देवाडा येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
गार्देवाडा येथे ३ जानेवारी रोजी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या केंद्राच्या स्थापनेसाठी गावकऱ्यांनी श्रमदान व लोकवर्गणीच्या माध्यमातून धान साठवणुकीसाठी ओटा बांधला आहे. या कार्यक्रमाला मा सैनुजी गोटा माजी जि प सदस्य,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. सचिन मोतकुरवार, ऑल इंडिया किसान सभेचे तालुका अध्यक्ष कॉ. रमेश कवडो,रवी अलोणे,गाव पाटील रमेश महा, सचिव विलास नरोटी, करमे सर, व अविका गार्देवाडाचे अध्यक्ष नवलू दोरपेटी, रेकलमेट्टा गाव पाटील महादू कवडो, कॉईनवर्षी पाटील सत्तू हेडो, डोदूर पत्तू पोटावी, रामलू गोटा, अजय कोरसा, मर्दाकुही पाटील दानू पल्लो, लालसाय महा, सत्तू दोरपेटी, मंगेश कोवसी, बंडू दोरपेटी यांसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
गार्देवाडा येथे उभारलेला ओटा गावकऱ्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून बांधला असून, या कामात विविध शेतकऱ्यांनी व जनप्रतिनिधींनी सहकार्य केले. या केंद्रामुळे गार्देवाडा परिसरातील नागरिकांना आता गट्टा येथे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. धान खरेदीसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी गार्देवाडा ग्रामसभेच्या एकत्रित प्रयत्नांचे कौतुक केले आणि भविष्यातही अशाच प्रकारे ग्रामसभा एकत्र येऊन काम करेल, अशी आशा व्यक्त केली.