* मेळाव्याच्या माध्यमातून संतांचे विचार तेली समाजात पोहचविण्याची आवश्यकता …. प्रमोदजी पिपरे

37

* मेळाव्याच्या माध्यमातून संतांचे विचार तेली समाजात पोहचविण्याची आवश्यकता …. प्रमोदजी पिपरे

श्री. संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ आरमोरी जिल्हा गडचिरोली द्वारा आयोजित श्री.संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळावा वधू-वर मेळावा तसेच ज्येष्ठाचा, सेवानिवृत्त व प्रविण्य प्राप्त विद्याथ्यांचा गुण गौरव सोहळा दि.5.1.2025.रोज रविवारला संताजी ग्राउंड, कोसा विकास जवळ वडसा रोड, आरमोरी येथे पार पडला.

यावेळी श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.तेली समाजाला एकसंघ करण्यासाठी मेळाव्याची आवश्यकता आहे

श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आरमोरी येथे दरवर्षी तेली समाजाचा मेळावा आयोजित केल्या जाते,आयोजकच्या परिश्रमातून मेळाव्याची तयारी करतात त्यामुळे आयोजकाचे अभिनंदन करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाने, संत श्री. संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ मंजूर केल्या बदल, महाराष्ट्र शासनाचा अभिनंदन करण्यात आला, असा ठराव आजच्या मेळाव्यात घेण्यात आला.

असे आव्हाहन श्री.प्रमोदजी पिपरे यांनी केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.भाग्यवानजी खोब्रागडे साहेब, अध्यक्ष, श्री. किसनराव खोब्रागडे एज्यूकेशन सोसायटी, आरमोरी.

मुख्य मार्गदर्शक, मा. श्री. बबनरावजी फंड साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा.

उदघाटक, सौ. योगिताताई पिपरे, माजी. नगराध्यक्ष न. प. गडचिरोली,श्री.प्रभाकरजी वासेकर अध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली.

प्रमुख अतिथी, श्री. संजयजी येरणे सामाजिक वक्ते नागभीड, श्री. परसरामजी टिकले माजी. सभापती प. सं. वडसा, श्री. भाष्करराव बोडणे उपसरपंच ग्रामपंचायत, वैरागडे, श्री. पुंडलिकराव जुवारे ठानेगाव,श्री. मुखरुजी खोब्रागडे माजी. अध्यक्ष, तेली समाज वैरागड, श्री. डॉ.प्रदीपजी चापले प्रा. वनश्री महाविद्यालय, कोरची.

या वेळी आयोजक श्री. बुधाजी किरमे अध्यक्ष, श्री. रामभाऊ कुरझेकर उपाध्यक्ष, श्री. देविदास नैताम सचिव, श्री. तुळशीरामजी चिलबुले सहसचिव (से. नी तहसीलदार )श्री. विवेक घाटूरकर कोषाध्यक्ष, श्री.शंकरराव बावणकर, श्री.प्रा. गंगाधरजी जुवारे, श्री. विवेकजी घाटुळकर, श्री. मिलिंदजी खोब्रागडे, नगरसेवक आरमोरी श्री. द्वारकाप्रसाद सातपुते, श्री.विलास सातपुते व सर्व तेली समाज युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते.