आमदार मा.डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते लांझेडा येथील संत श्री शिरोमणी जगनाडे महाराज सार्वजनिक वाचनालय येथे पुस्तकाचे वाटप

27

आमदार मा.डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते लांझेडा येथील संत श्री शिरोमणी जगनाडे महाराज सार्वजनिक वाचनालय येथे पुस्तकाचे वाटप

 

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतांना येणाऱ्या विविध समस्यावर मार्गदर्शन

 

विद्यार्थ्यांना नविन वर्षाच्या व भावि वाटचाली च्या दिल्या शुभेच्छा

 

दिं 06/01/2024

 

गडचिरोली : विद्यार्थ्यांनी करिअर घडवण्यासाठी आपली परिस्थिती नाही तर मन:स्थिती महत्त्वाची आहे सोशल मीडियाचा अतिवापर टाळून आयुष्यातील वेळ वाया न घालवता त्याचा योग्य वापर करून संधिचा सोन करून येणाऱ्या प्रत्येक संकटाला संधी मानून समोर गेल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चित यश मिळेल असा विश्वास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला.

 

विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जीवन समृद्ध करण्यासाठी व वाचन संस्कृती वृध्दिंगत होण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयाच्या योगदान महत्त्वातचे आहे.

 

विद्यार्थ्यांचा गुणात्मक विकास व्हावा, आपला ध्येय समोर ठेवून जिद्द चिकाटिने अभ्यास करून विविध क्षेत्रात यश संपन्न करून आपल्या आई वडिलांचा आपल्या गावाचा आपल्या जिल्हा चा नाव गौरव करावा या उद्देशाने आज आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी लांझेडा येथील संत श्री शिरोमणी जगनाडे महाराज सार्वजनिक वाचनालय येथे भेट दिली व त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी लागणारे पुस्तकांचे वाटप केले.

यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज गुंडमवार, पंकज नैताम,रोशन नैतांम , निखिल गुंडमवार ,परमानंद पून्नावार विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते