खास. अशोक नेते यांनी संसद भवनात घेतला कोविशिल्ड वैक्सिन चा पहिला डोज

59

खास. अशोक नेते यांनी संसद भवनात घेतला कोविशिल्ड वैक्सिन चा पहिला डोज

नवी दिल्ली : – दि. 9 मार्च

भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते यांनी आज नवी दिल्ली येथील संसद भवन Annexe मध्ये आज दि.9 मार्च 2021 रोजी कोविशिल्ड वैकसीन चा पहिला डोज घेतला.

तसेच यावेळी खासदार अशोक नेते यांनी जनतेला आवाहन केले की, माझी सगळ्याना नम्र विनंती आहे की, ही कोविड ची लस पुर्णपणे सुरक्षित असुन सर्वांनी ही लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावे. व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी व कोविड-19 पासून आपला बचाव करावा व वायफ़ळ अफवांवर विश्वास ठेवू नका.असे आवाहन केले. व ही लस जरी घेतली तरी नियमित मास्क वापरावे. दररोज बाहेरून आल्यानंतर साबणाने हात धुऊन सँनिटायझर चा वापर करावा व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करून कोरोना या महाभयंकर आजाराला पळवून लावण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले आहे.