सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वात महावितरण कंपनी वडसा ला घेराव,शेकडो शेतकरी उपस्थित।

76

सुरेंद्रसिह चंदेल यांचे नेतृत्वात महावितरण कंपनी वडसा ला घेराव,शेकडो शेतकरी उपस्थित।

वडसा :- तालुक्यातील बोळधा, कोरेगाव,चोप परिसरातील शेतकऱ्याचे कृषी पंपाचा विद्युत पुरवठा दिवसा वारंवार खंडित होत होता,दिवसातुन फक्त एक ते दोन तास विद्युत पुरवठा सुरू राहात होता,त्यामुळे परिसरातील शेतकरी ग्रस्त झाले होते,वारंवार निवेदन देऊन सुद्धा महावितरण ने लक्ष दिले नाही,त्यामुळे हातात आलेले पीक मरतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,त्यामुळे सुरेंद्रसिह चंदेल माजी जिल्हाप्रमुख शिवसेना याचे नेतृत्वात महावितरण कंपनी ला धडक देण्यात आली व विद्युत विभागाचे अधिकारी,साळवे व सामृतवार यांना घेराव करण्यात आला,विद्युत पुरवठा वारंवार का खंडित होते याचा जाब विचारण्यात आला,विद्युत पुरवठा आताच्या आत्ता सुरळीत झाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली,त्या वेळेस उपविभागीय अभियंता श्री साळवे यांनी म्हटले की मी कोरेगाव,बोलधा, चोप व पोटगाव येथील विद्युत पुरवठा एकाच फिडर मधून आहे,तर पोटगाव चा पुरवठा वेगळा करून कोरेगाव,बोलधा चोप चा एकाच फीडर वर करू,त्यामुळे तेवढा लोड कमी होईल व वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही,असे सुचविण्यात आले,येत्या चार पाच दिवसात काम होईल असे सांगितले,तोपर्यंत दिवसा सतत तीन तास विद्युत सुरू राहील,तीन तास बंद राहील,सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा पर्यंत सुरू राहील,असे सांगितले,त्यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी समाधानी झाले।घेराव एक तास पर्यंत करण्यात आला,परत विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलन,चक्काजाम,कार्यालयाला ताला ठोकू असा इशारा देण्यात आला,
घेराव आंदोलनात माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, उपजिल्हाप्रमुख भरत जोशी,माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम,dr अनिल उईके,महादेवजी गायकवाड बोलधा, उपस्थित होते