*एटापलीत पत्रकार दिन उत्साहात साजरा*
एटापली तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्याचे उपविभागीय अधिकारी श्री.नमन गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम,पोलीस निरीक्षक नीलकंठ कुकडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन कन्नाके, पंचायत विस्तार अधिकारी साईनाथ साळवे,प्रशासन अधिकारी मडावी,एटापल्ली नगरपंचायत चे नगरसेवक रमेश टिकले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेषराव संगडीवार यांनी भूषवले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवीभाऊ रामगुंडेवार तसेच तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून पत्रकारितेचे महत्त्व,समाजातील भूमिका,तसेच पत्रकारांवर असलेली जबाबदारी यावर प्रकाश टाकला.त्यांनी तालुक्यातील पत्रकारांच्या कार्याचे कौतुकही केले.
कार्यक्रमाच्या शेवटी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.हा दिवस पत्रकारांच्या योगदानाला सलाम करणारा ठरला.