गट साधन केंद्र एटापल्ली येथे महावाचन उत्सव उपक्रमांतर्गत विजेत्यांना प्रमाणपत्र व पुस्तक संचाचे वितरण.
तालुका एटापल्ली अंतर्गत इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकरीता सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना वाचनाची व लेखनाची आवड निर्माण व्हावी म्हणून महावाचन उत्सव कार्यक्रम घेण्यात आला.उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुक्यातून गटनिहाय प्रथम,द्वितीय व तृतिय क्रमांक पटकाविलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना गट साधन केंद्र एटापल्ली येथे बुधवार (दि.8) ला विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यासाठी बक्षिस म्हणून पुस्तक संच व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प.स.एटापल्लीचे गट शिक्षणाधिकारी निखिल कुमरे होते.प्रमुख अतिथी म्हणून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पोर्णीमा शिंपी, मुख्याध्यापिका श्रीमती सिंपल मुधोळकर, श्री.मंडल मुख्याध्यापक जि.प.उ.प्रा.शाळा च़दणवेली, मार्गदर्शक शिक्षक,विषय साधनव्यक्ती कु.जिजाबाई झाडे,श्री. अनिल गजबे उपस्थित होते.
गट क्रमांक अ, इयत्ता 3 री ते 5 की मधून कु.अनन्या गुरूदास वैरागडे वर्ग 4 था जि.प.उ.प्रा.शाळा चंदणवेली हिने तालुका स्तर प्रथम व जिल्हास्तर तृतिय क्रमांक, आयुषि राहुल चुनारकर वर्ग 4 था जि.प.उ.प्राथ.शाळा डूम्मे द्वितीय, गायत्री अरविंद गव्हारे वर्ग 5 वा जि.प.हायस्कुल एटापल्ली तृतिय क्रमांक पटकाविला. इयत्ता 6 वी ते 8 गट ब, मधून हर्षल राकेश मोहुर्ले वर्ग 8 वा राजिव गांधी हायस्कुल एटापल्ली प्रथम, श्रेया गुरूदास अलोणे वर्ग 7 वा जि.प.उ.प्राथ.शाळा डूम्मे द्वितीय, जागृती शोभन मुडमडीगेला वर्ग 6 वा तृतिय क्रमांक मिळविला.
इयत्ता 9 वी ते 12 वी गट क, रोहीत रमेश उसेंडी वर्ग 10 वा राजिव गांधी विद्यालय एटापल्ली प्रथम, क्रिष्णा पांडूरंग तलांडे वर्ग 10 वा जि.प.हायस्कुल एटापल्ली द्वितीय, तन्वी रविंद्र कोसरे वर्ग 10 वा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली तृतिय क्रमांक मिळविला.
विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस म्हणून गटनिहाय ठराविक रकमेचे पुस्तक संच व सहभाग प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.