आज गडचिरोली जिल्ह्यात 27 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्त

109

आज 27 नवीन कोरोना बाधित तर 33 कोरोनामुक्त

गडचिरोली,(जिमाका)दि.09:आज जिल्हयात 27 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 33 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9726 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9462 वर पोहचली. तसेच सद्या 156 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.29 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.60 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.
नवीन 27 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 16, तर अहेरी तालुक्यातील 1, आरमोरी तालुक्यातील 2, चामोर्शी तालुक्यातील 1, धानोरा तालुक्यातील 1, कोरची तालुक्यातील 1,कुरखेडा तालुक्यातील 1, वडसा तालुक्यातील 4,जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 33 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 31, अहेरी 1, कुरखेडा 1,जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील श्री कॉम्पुटर धानोरा रोड 4,स्थानीक 2, साईनगर 2, कोटगल 1, नवेगांव 2, स्नेहनगर 1,कॅम्प एरिया 2, कुबीं 1, तर चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये घोट 1, अहेरी तालुक्यातील आलापल्ली 1,आरमोरी तालुक्यातील स्थानीक 1, इंदीरा नगर वैरागड 1, धानोरा तालुक्यातील आश्रम शाळा गीरोला 1,कोरची तालुक्यातील पी.एस. 1,कुरखेडा तालुक्यातील स्थानीक 1, वडसा तालुक्यातील हनुमान वार्ड 1, गांधी वार्ड 2, कुरुड 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील बाधिता मध्ये 1 जणांचा समावेश आहे.