*समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून*
गडचिरोली दि. 9 : समाज कल्याण विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांचे संयुक्त विद्यमाने नागपूर विभागातील 6 जिल्ह्याचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांचे सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धा 10 ते 12 जानेवारी चे दरम्यान गडचिरोली येथील शासकीय निवासी शाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन 10 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी श्री.विजय वाकुलकर उपसंचालक, श्री.सिद्धार्थ गायकवाड उपायुक्त चंद्रपूर, श्री.देव सुदन धारगावे उपायुक्त गडचिरोली ,श्री.मंगेश वानखेडे उपायुक्त नागपूर, श्री.विनोद मोहतुरे सहाय्यक आयुक्त चंद्रपूर, श्रीमती.सुकेशनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त नागपूर, श्रीमती. आशा कवाडे संशोधन अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. क्रीडा महोत्सवात नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातून सुमारे एक हजार कर्मचारी आणि एक हजार विद्यार्थी सहभागी होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजनाची जबाबदारी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांच्याकडे आहे.
0000