*_अहेरीत “घर चलो” भाजप सदस्यता अभियान उत्साहात पार पडला_*

14

*_अहेरीत “घर चलो” भाजप सदस्यता अभियान उत्साहात पार पडला_*

*_मा.खा. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली जनतेचा प्रचंड प्रतिसाद_*

 

अहेरी, दिं. १० जानेवारी २०२५:

 

अहेरी विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत “घर चलो” मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या अभियानाचे नेतृत्व माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी केले. अभियानाला अहेरीतील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

 

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री मा.ना.श्री. चंद्रशेखर बावणकुळे यांच्या काल झालेल्या मोबाईल व्हर्च्युअल बैठकीनंतर, त्यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला. “समर्थ भारत आणि विकसित भारत” घडविण्यासाठी भाजपाच्या या सदस्यता मोहिमेला अहेरी विधानसभा क्षेत्रात सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

 

अहेरी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मोहिमेची सुरुवात झाली. मा.खा. अशोकजी नेते यांनी दुकानदार, पानठेला विक्रेते, फुटपाथ व्यापारी, चहावाले आणि घरोघरी जाऊन नागरिकांना भाजपाचा सदस्य होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी जनतेशी संवाद साधत भाजपा परिवाराचा भाग बनण्याचे आवाहन केले.

 

प्रमुख सहकार्य आणि सहभाग

या अभियानात तिरुपती बद्दीवार, साईनाथ मुनूरवार, रवी सिल्लमवार, यश गुप्ता, तगतसिंग राजपुरोहित, रवी जोरीगलवार, महेबुब खान पठान,तुप्ती मद्देरर्लावार, जयश्री मद्देरर्लावार,मधुकरजी नामेवार, रमेश समुद्रवार, लक्ष्मी मद्दीवार यांसह अनेक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

 

प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा उपाध्यक्ष विनोदजी आकनपल्लीवार,तालुका अध्यक्ष संतोष मद्दीवार, शहराध्यक्ष मुकेश नाम्मेवार,.ता.महामंत्री सुकमा हलदार,रमेश समुद्रवार नगरसेविका शालिनी पोहनेकर, महिला नेत्या किरणताई भांदकर, लक्ष्मी मद्दीवार, वैशाली देशपांडे, गुड्डभाऊ ठाकरे,प्रशांतजी डोंगे, दिनेश येनगंटीवार,पदमा शेडमेक, रमेश मडावी,राजु पेंदाम, यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियान यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.

 

*सदस्यता अभियानाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे*

“समर्थ भारत आणि विकसित भारत घडविण्यासाठी भाजपाचा भाग बना,” असे आवाहन करत मा.खा. अशोकजी नेते यांनी जनतेला प्रोत्साहन दिले. या अभियानाने अहेरीतील भाजपा सदस्यसंख्या वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

भाजपाच्या या “घर चलो” सदस्यता अभियानाने स्थानिक पातळीवर जनतेशी जोडलेपण निर्माण केले असून, आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्याचे संकेत दिले आहेत.