डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात….

67

डेरा आंदोलनाच्या समर्थनार्थ विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात….

…तर शासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील…..
पप्पू देशमुख यांचा इशारा

चंद्रपूर:

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या डेरा आंदोलनाला ३० दिवस पूर्ण झालेले आहेत. मात्र अजून पर्यंत ७ महिन्यांचा थकीत पगार कोविड योध्द्या कामगारांच्या खात्यावर जमा झालेला नाही. नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात वैद्यकीय महाविद्यालय व वैद्यकीय शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याने 500 कंत्राटी कामगारांचे वेतन देण्याचा प्रश्‍न निर्माण होत झालेला आहे.त्यामुळे शासनाने कामगारांच्या खात्यावर थेट पैसे जमा करण्याची परवानगी देऊन डेरा आंदोलकांचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे करावे.अन्यथा चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक संघटना कोविड योध्द्या कंत्राटी कामगारांच्या समर्थनार्थ तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत असुन याचे परिणाम शासन व प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांनी दिला.
नुकतेच या आंदोलनाला दारूमुक्ती कृती समितीचे जिल्हाध्यक्ष विजय चिताडे, उपाध्यक्ष आन्याजी ढवस, सचिव दयाराम नन्नावरे, सहसचिव देवराव बोबडे, सल्लागार धर्माजी खंगार तसेच चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन चे अध्यक्ष नरेद्र बोबडे यांच्या नेतृत्वात कार्याध्यक्ष रमेश पायपरे , सचिव राजू साखरकर, मनोज पावडे, प्रशांत दोतुंलवार, उमेश पंधरे व शिवसेना पदाधिकारी भारती दुधानी, संध्या तोहगावकर तसेच श्रमजिवी कोयला कामगार संघर्ष संघाचे अध्यक्ष माज अहमद सिद्दिकी महासचिव अॅड.अब्दुल कलाम कुरेशी अशा विविध संघटनेच्या शिष्टमंडळांनी भेट देऊन समर्थनाचे पत्र जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना दिले.