समाज संघटनेच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे…… योगिता पिपरे

9

समाज संघटनेच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे…… योगिता पिपरे

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मु. मांढळ ता. कुही जी. नागपूर,यांच्या द्वारा आयोजित श्री. संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व महिला मेळावा, समाजातील वृद्ध महिलांचा व उत्तीर्ण विद्यार्थांचा सत्कार सोहळा कार्यक्रम दि.12-1-2025 रोज रविवारला राम मंदिर सभागृह मांढळ येथे घेण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष,सौ. योगिताताई पिपरे उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महा.प्रां. तेली महासभा तथा माजी. नगराध्यक्ष न. प. गडचिरोली !! यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि.

आपल्या समाजातील महिलांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे व होण्याऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात एक होऊन लढा देण्याकरिता स्वतः मध्ये ताकत निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

तसेच महिलांनी शासनाच्या मोफत योजनाचा फायदा उदा. मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना,मोफत राशन, महिलांना बस ची अर्धी तिकीट,बेटी बचाव बेटी पडाव, उज्वला गॅस, मातृत्व वंदन योजना, वयोश्री योजना, धार्मिक स्थळांना भेटी देणे योजना, इत्यादी योजनाचा फायदा घ्यावा व संताजी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी फायदा घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी असे आव्हाहन योगिताताई पिपरे यांनी केले.

यावेळी महिला मेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे उदघाटक, मा श्री. जगदीशजी वैद्य,नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष म. प्रां. तै. महासभा,यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक,श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष म. प्रां. तै. महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली, यांनी सुद्धा मार्गदर्शन केले,सौ. माधुरीताई तलमले, विदर्भ महिला संघटक आघाडी म. प्रां. तै. महासभा, श्री. प्रवीणजी बावनकुळे विभागीय अध्यक्ष युवा आघाडी,म. प्रां. तै. महासभा नागपूर,श्री. भाऊरावजी जिभकाटे, श्री. नंदकिशोर दंडारे,सौ सविताताई कुलस्कर,श्री.पुष्कर डांगरे,सौ. मनीषा फेंडर, सौ. सोनू निरगुळकर, श्री. राम जुमळे,

कार्यक्रमाचे आयोजक. सौ. संगीता पडोळे, सौ. चांदणी तळेकर, सौ. प्रमिला मस्के,सौ. सीमा कुर्जेकर व तेली समाजातील महिला बहुसंख्येने उपस्थित होते.