*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांच्या हस्ते भव्य कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन…!*
चामोर्शी : तालुक्यातील येडानूर येथील नवयुवक क्रीडा मंडळ येडानूर यांच्या सौजन्याने क्रांतीसूर्य बिरसा मुंडा चषक 2025 भव्य प्रोंढाचे प्रो कब्बड्डी सामन्याचे आयोजित केले आहे.या कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि काँग्रेस नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी हस्ते उदघाटन करण्यात आली.
प्रो कब्बड्डी स्पर्धेसाठी काँग्रेसनेते,माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक तसेच रुपेश लेनगुरे कडून शिल्ड देण्यात आली.द्वितीय पारितोषिक माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी,अनिलभाऊ,रुपेश लेनगुरे कडून तसेच तृतीय पारितोषिक रजनीबाई पांडुरंग,डी.टी.हरडे साहेब,संतोष पदा,सुनील पवार,कोमल पोटावी,आकांक्षा पोटावी कडून देण्यात येत आहे.
कार्यक्रमचे प्रमुख अतिथी म्हणून येडानूर ग्रामपंचायतचे सरपंच रजनी उसेंडी होते.त्यावेळी मंडळकडून अजय कंकडालवार यांचे सत्कार करण्यात आली.तसेच विविध नृत्याने कंकडालवारांचे स्वागत केले.सर्व प्रथम बिरसा मुंडा,सावित्रीबाई फुले प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
उदघाटन प्रसंगी मंचावर येडानूर ग्रामपंचायतचे उपसरपंच सुनील पवार,काँग्रेस नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सोनाली कंकडालवार,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे,माजी सरपंच संतोष पदा,ग्रामसेवक हरडे साहेब,तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी पोरावी,पोलीस पाटील पत्रूजी पोरावी,सारंगधरी कुंभमवार,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाअध्यक्ष प्रभाकर वासेकर,हलमी तलाठी,जीवन पोरावी,जे.एम.चव्हाण,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते,क्रीडा प्रेमी तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.