शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर सोनवाणे मॅडम , यांच्याकडे आज जितू भाऊ धात्रक आणि मेहा वासीय यांचा पाठपूरावा मोर्चा/आंदोलन..
एक महिन्याच्या आत शिक्षक देण्याचा आश्वासन मात्र न दिल्यास शाळाबंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला..
मेहा बुजरुक ता सावली येथे इयत्ता ७ वी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहेत. ह्यात ७ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक यांची गरज आहे. पण मागील २ वर्षापासून फक्त ४ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे एकाच वेळेस दोन अलग वर्गाला शिकवल्या जात आहेत. त्यामुळे ह्यात गरीब आणि खेड्यातील विद्यार्थाचा खूप मोठा शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. भविष्यात खूप मोठा फटका ह्या गोष्टीमुळे शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याला बसेल. आणि पालक हे गरीब असल्यामुळे ते त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवू शकत नाही त्यामुळे त्यांच्या पुन्हा नुकसान होईल. आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकास होणार नाही आणि त्यांचे भविष्य हे अंधारमय होईल..ह्या अगोदर गावात पालक सभा घेतली आणि सावली येथे बीडीओ आणि तहसीलदार यांच्याकडे सुद्धा मोर्चा/ आंदोलन केला. तेव्हा त्यांच्याकडून १ महिन्यात तुम्हाला शिक्षक देऊ असे आश्वासन देण्यात आले होते पण ते न केल्यामुळे आज डायरेक्ट शिक्षणधिकारी जिल्हां परिषद सोनवाने मॅडम यांच्यावर मोर्चा/ आंदोलन करण्यात आले. आणि निवेदन देण्यात आले. त्यावर त्यांनी एक महिन्याच्या आता मेहा बुजरुक येथे शिक्षक देतो असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे सगळे शिष्टमंडळ वापिस आले..आता जर एक महिन्यात शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही तर शाळाबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा जितू भाऊ धात्रक तसेच सर्व शिष्टमंडळ तर्फे देण्यात आला..
यांच्या विरोधात आंदोलन/ मोर्च्यात जितू भाऊ धात्रक,प्रकाश कोलते, नंदाजी पेंदाम, रोशन पेंडाम, मदन निकुरे, प्रमोद इलमलवार , गोपीचंद बोरकुटे, अभिषेक कोरडे,अमोल कोरडे,प्रतिभा कोलते,यामीना कोलते, शीतल गेडाम,गीता निकुरे,योगिता निकुरे,कविता निकुरे आणि इतर महिला व पुरुष उपस्थित होते..