*माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते कब्बड्डी सामन्यातील विजेता व उपविजेता संघाला बक्षीस वितरण*
*एकलव्य कब्बड्डी क्लब च्या वतीने भव्य डे – नाईट वजन गट मुलांचे कब्बड्डी सामन्याचे आयोजन*
*दि. 13 जानेवारी चामोर्शी*
*चामोर्शी : तालुक्यातील वालसरा येथे एकलव्य कब्बड्डी क्लब यांच्या वतीने कब्बड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम बक्षीस शिवछत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा संघ ठाकरी, द्वितीय एकलव्य संघ वालसरा, तृतीय वीर मराठा संघ वालसरा विजेता व उपविजेता संघाला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस देण्यात आले .*
*यावेळी जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, लोमेश सातपुते, विनायक बारसागडे, हिराजी आत्राम, नीलकंठ मडावी, संजू मडावी, बाबुराव मडावी, ज्ञानेश्वर कोटनाके, कवडू सिडाम योगेश्वर कुमरे मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विजेता, उपविजेता संघांचे खेळाळू तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.*