*अहेरीत झाली आमसभा…*
अधिकारी व कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले
*प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी निर्देश दिले*
*अहेरी:-* अहेरी पंचायत समिती अंतर्गत सोमवार 13 जानेवारी रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा पार पडली.
यावेळी मंचावर प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री ताई आत्राम, संवर्ग विकास अधिकारी राहुल वरठे, नायब तहसीलदार गुणवंत बाबीटकर, माजी पंचायत समिती सदस्य रामेश्वरबाबा आत्राम, ज्येष्ठ नेते बबलु भैय्या हकीम , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, अहेरी तालुक्यातील रस्ते, पुलीया, वीज, सिंचन, शिक्षण, आरोग्य, घरकुल याचा आढावा घेऊन रेंगाळत असलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले व यापुढे कामात दुर्लक्ष व हयगय खपवून घेतल्या जाणार नसल्याचे खडे बोल सुनावले.
अहेरी शहरातील अतिक्रण व रस्त्यांचा विषय चांगलाच गाजला. मागील एक वर्षापासून मुख्य रस्त्याचे डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने सबंधित कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करण्याचे नागरिकांनी मागणी केले.
अहेरी शहरात अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे तसेच अतिक्रमणाचा विषय मागील अनेक वर्षांपासून ठप्प पडला आहे त्यामुळे मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे अशी मागणीही आमसभेत लावून धरण्यात आले. त्यावर आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सकारात्मक पाऊल उचलण्याचे संकेत दिले. त्यामुळे आमसभेत अतिक्रमणाचा विषय चांगलाच गाजला.
पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी उपाय योजना करण्याचे निर्देश देऊन कृषी योजने मार्फत शेतकऱ्यांना योग्य सोयी सवलत्या मिळावे व शासनाचे विविध नावीन्यपूर्ण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये याकडेही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी भर देऊन विकासात्मक कामांना गती देण्याचे आवाहन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, रियाज शेख, लक्ष्मण येरावार, नागेश मडावी, उपसरपंच किशोर करमे आदींनी रेंगाळत असलेले प्रश्न व विविध विकासात्मक कामांकडे लक्ष वेधले होते.
आमसभेत अहेरी पंचायत समिती अंतर्गत विविध विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते , शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.