चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महिला महासंघाचा स्तुत्य उपक्रम

70

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महिला महासंघाचा स्तुत्य उपक्रम

  चंद्रपूर:– आज दि 8/3/2021 ला ठीक 4 वाजता डेबू सावली वृद्धाश्रम देवाळा चंद्रपूर येथील वृद्धश्रमात राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महिला महासंघ चंद्रपूर च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी च्या हेतूने वृदाश्रमातील वृद्ध लोकांना बेड शिट भेट देऊन त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन महिला सक्षमीकरण दिनाचे महत्व विषद करण्यात आले, तसेच त्यांच्यात आनंद निर्माण व्हावा म्हणून त्यांच्या मध्ये असलेल्या कलेला सादरीकरणाची संधी देण्यात आली स्वरचित कविता त्यानी म्हणून दाखविल्य .. याप्रसंगी वृद्धाश्रमचे अध्यक्ष मान सुभाष शिंदे यांचीही उपस्थिती होती त्यानी आपल्या संस्थेबद्दल माहिती विशद केली या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महिला कर्मचारी अधिकारीमहासंघाच्या जिल्हाध्यक्ष कु रजनी मोरे, सरचिटणीस कु पौर्णिमा मेहरकुरे, उपाध्यक्षसौ लता मत्ते. कु विजया बोढे उपाध्यक्ष सौ मनिषा फुलझेले, कार्याध्यक्ष यांनी सर्वांशी हितगुज साधले व त्यांच्या पुढील निरोगी आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या..