*नाटक समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम: मा. खा. अशोकजी नेते यांचे प्रतिपादन*
दिनांक: १४ जानेवारी २०२५
रांगी (धानोरा):- मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर मौजा रांगी (जमिनदारी) येथे आदर्श नाट्य कला मंडळाच्या सौजन्याने आणि कला दर्पण नाट्य रंगभूमी, वडसा यांच्या सादरीकरणातून *संगीत जिवलगा घायाळ मी!* या नाटकाचा उद्घाटन सोहळा माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फित कापून उत्साहात पार पडला.
या नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणून उपस्थित राहिलेले माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी नाटकाच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. या माध्यमातून समाजाला उद्बोधन मिळावे आणि सकारात्मक बदल घडावा, यासाठी नाटकाचा प्रभावी उपयोग व्हावा.या नाटकाचे कौतुक करत समाजाला दिशा दाखवण्यासाठी नाटकाचा उपयोग केला पाहिजे. अशा कलाकृतींमुळे अधिक प्रगत होईल, अशी अपेक्षा मा.खा.नेते यांनी व्यक्त करत मकर संक्रातीच्या सर्व समस्त जनतेला यावेळी शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी, रांगी गावातील दिवंगत नाट्यकलावंत आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी व्यक्त करत उपस्थित मान्यवर आणि रसिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
रसिक आणि मान्यवरांनी एकत्रितपणे या श्रद्धांजली कार्यक्रमात सहभागी होत दिवंगत आत्म्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नाटय सभागृहात भावनिक वातावरण तयार झाले होते.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेट्टी, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, कृ.उ.बा.स. सभापती शशिकांत साळवे, उपसभापती लाकडे साहेब, सरपंच गेडामताई, वनक्षेत्र सहाय्यक रामगुंडावार, सय्यद सर, अंतूभाऊ साळवे, सुहास अंबादे, भुषण काटेंगे, साजन गुंडावार, शहराध्यक्ष सारंग साळवे, बनपुरकर सर, जयंत महाराज काटेंगे, रामरतन गोव्हणे, नितीन हेमके, पांडुरंग समर्थ, संजय कुंडू, प्रल्हाद भाऊ म्हशाखेत्री, जीवन ठाकरे, दिवाकर भोयर, जगदीश कन्नाके यांसह परिसरातील अनेक मान्यवर व रसिक उपस्थित होते.
या नाटक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांवरून आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले.