*एटापल्लीत “घर चलो” भाजप सदस्यता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद: जनतेत उत्साहाचे वातावरण… मा.खा.अशोकजी नेते.*
*_आम्ही भाजपाचे सदस्य होऊन नोंदणी केली आपणही भाजपाचे सदस्य व्हा. मा.खा.नेते.यांचे आवाहन_*
दिनांक: १४ जानेवारी २०२५
एटापल्ली:- भारतीय जनता पक्षाच्या “घर चलो” विशेष सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत अहेरी विधानसभेतील एटापल्ली शहरात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली अभियानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “समर्थ भारत आणि विकसित भारत घडविण्यासाठी भाजपाचा भाग बना,” असे आवाहन करत अशोकजी नेते यांनी स्थानिक नागरिकांना प्रेरित केले.
*एटापल्ली प्रभागातील उत्साही सहभाग:*
यात गौतम पाल,तुळशीदास गुडमेडलावार,निखील नक्कुलवाला,कालीदास कर्मकार, साई कोमार,जितेंद्र खन्ना,नंदलाल सरकार, कोमल विलास चिटमलवार,संदेश नर्लावार, दिपक सोनटक्के यासह अनेक एटापल्ली शहरातील मुख्य रस्त्यांवरून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. मोहिमेदरम्यान अशोकजी नेते यांनी स्थानिक दुकानदार, पानठेला विक्रेते, फुटपाथ व्यापारी, सलून व्यावसायिक, तसेच नागरिकांशी संवाद साधला. भाजपाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी त्यांनी आवाहन करत पक्षाच्या सामाजिक व विकासात्मक भूमिकेवर भर दिला.
*सदस्य नोंदणी प्रक्रिया:*
ऑनलाइन नोंदणीसाठी: ८८००००२०२४ या क्रमांकावर मिस कॉलद्वारे सहज नोंदणी प्रक्रिया राबवली.
एटापल्ली हे भाग
दुर्गम भागांतील असुन सदस्यता नोंदणीसाठी: मोबाइल नेटवर्क नसलेल्या भागांमध्ये ऑफलाइन फॉर्मद्वारे नोंदणी सुनिश्चित करण्यात आली.
या अभियानाला जेष्ठ नेते व ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष बाबुरावजी गंफावार, शहराध्यक्ष निखील गाद्देवार, जिल्हा सचिव विजयभाऊ नर्लावार, तालुका महामंत्री प्रसाद फुल्लूरवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष संपतजी पैडाकुलवार, राकेश हिरा, प्रशांत मंडल, प्रभाकर कुंकटलावार, तसेच एटापल्लीतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली.
*उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पुढील वाटचाल:*
एटापल्ली शहरातील जनतेने या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिला. भाजपाच्या सामाजिक व विकासात्मक दृष्टिकोनामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढत असून स्थानिक पातळीवर जनतेशी थेट संवाद साधण्याचे उद्दिष्ट गाठले जात आहे.