रेतीच्या ओवर लोड वाहतुकीमुळे मार्कंडादेव मंदिर जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर..
तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी..
मार्कंडादेव :- विदर्भाची काशी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या मार्कंडादेव येथील मंदिर परीसर लगतच्या रस्त्याहुन मोहुर्ली या ठिकाणांहून रेती भरलेले ट्रक मार्गक्रमण करीत आहेत या ओवरलोड वाहतुकीमुळे मार्कंडादेव मंदिर जमिन दोस्त होण्याची वेळ येत आहे.
सविस्तर वृत्त असे की मोहुर्ली या गावातील रेती घाटाहुन रेतीची वाहतुकीला सुरवात केली आहे. साधारणपणे 1 महिण्याचा कालखंड होता. रामाळा, घारगांव , मोहुर्ली या गावातुन ही वाहतुक केली जात होती. पण गावकऱ्यांनी गावातून वाहतूक बंद केल्याने मार्कंडा देव या गावातील रस्त्याने आपला मार्गक्रमण करण्यास सुरवात केली आहे. ही सदर रेती भरलेले मोठ्या टनाचे ट्रक मार्कंडादेव येथील मंदिर परीसरालगतच्या रस्त्यानी जात आहे त्या मोठ्या गतीने कंपन तैयार होत असुन मार्कंडा देव मंदिर जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर आले आहे. सदर वाहतुक लगेच बंद न केल्यास मार्कंडादेव मंदिर पडल्या जाईल यात तिळमात्र शंका नाही.
सोबतच मार्कंडा देव येथील ग्रामवासीय जीव मुठीत घेऊन रस्त्यावरुन प्रवास करीत आहे. या ट्रकच्या वाहतुकीमुळे जिवित हानी होण्याची शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही.
या संबधाने स्थानीय नागरीकांनी चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घरुडे, उपविभागीय अधिकारी अमीत रंजन यांना विनंती करुन सांगीतले की ही वाहतुक बंद करावी पण अजुन पर्यंत मार्कंडादेव येथुन जाणारी रेतीची औवरलोड वाहतुक बंद झाली नसल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासन मार्कंडादेव येथील मंदीर जमीनदोस्त होण्याच्या किंवा एखाद्या जिवितीहाणीची वाट पाहत आहे की काय असाच प्रश्न निर्माण होत आहे?
सार्वजनिक बांधकाम विभागानी ईतक्या मोठ्या टनानी भरलेला ट्रक ओवरलोड वाहतुक करण्यासाठी रस्ता निर्माण केला होता काय हा प्रश्न सुद्धा अनुऊर्तीन आहे. ही ओवरलोड रेतीची वाहतुक बंद झाली नाही तर इ.स.वी सन आठव्या शतकातील मंदीर जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही.याला संपूर्ण जबाबदार हा तालुका व जिल्हा प्रशासन असेल असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.