*सुप्त गुणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो* आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

31

*सुप्त गुणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो*

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

*डीबीए पब्लिक शाळेत स्नेह संम्मेलन*

 

*अहेरी:*- सुप्त व कला गुणातुनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

ते गुरुवार 16 जानेवारी रोजी स्थानिक डि.बी.ए. पब्लिक शाळेत वार्षिक स्नेह संम्मेलन महोत्सवात उदघाटनीय स्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सूर्यभान डोंगरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून रंगमंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्रबाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, मुख्याध्यापिका सपना वेन्नुरी, किष्किद्रराव बाबा आत्राम, रामेश्वरबाबा आत्राम, केंद्रप्रमुख विनोद पुसलवार, जगन्नाथ सडमेक, ॲड. उदयप्रकाश गलबले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, बाल शालेय विद्यार्थी दशेतुनच विद्यार्थी घडत असतो, कुंभार जसे मातीला आकार देऊन मातीतून कला शिल्प बनवितो अगदी तसेच शिक्षक सुद्धा बाल विद्यार्थी व चिमुकल्यांना घडवीत असतो असे उदाहरणे देऊन मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सपना वेन्नुरी यांनी तर संचालन सपना मेश्राम व मनिषा मुडपल्लीवार यांनी केले. आभार शिक्षक अन्सार शेख यांनी मानले.

त्यानंतर विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून वेगवेगळ्या गीतातून नृत्याचे सादरीकरण केले.

यावेळी नारायणराव बाबा आत्राम, माजी प्राचार्य रतन दुर्गे, सुरेंद्र अलोणे, नागेश मडावी, संतोष बेझंकिवार, विद्यार्थी, पालकवर्ग व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून होते.

यशस्वितेसाठी वैष्णवी कैदलवार, हिना पठाण, प्रदीप देशपांडे, विकास आचेवार, रणजित सोनावणे कशिष शेख, मनोज कैदलवार, सविता रामटेके, मनीषा ठाकरे, निखिल, श्रीलता श्रीरामवार आदींनी सहकार्य केले.