*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कल्याणासाठीच उपक्रमाचा उपयोग होतो-मा ऋषिकेश बुरड कर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांचे प्रतिपादन.*

45

*विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कल्याणासाठीच उपक्रमाचा उपयोग होतो-मा ऋषिकेश बुरड कर गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली यांचे प्रतिपादन.*

—————————————

*गट साधन केंद्र एटापल्ली च्या वतीने “तालुकास्तरीय Hackathon” कार्यशाळा.*

एटापल्ली:वृत्तवाणी न्युज

एटापल्ली गट साधन केंद्राच्या वतीने तालुकास्तरीय Hackathon कार्यशाळा आयोजित करण्यात आली.त्या कार्यशाळेचे उदघाटन गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर यांचे हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कल्याणासाठीच उपक्रमाचा उपयोग होतो.असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश बुरडकर यांनी गटसाधन केंद्राच्या वतीने तालुकास्तरीय Hackathon कार्यशाळेत केले.

 

 

 

*हॅकेथान उपक्रमाचे उद्दिष्टे.*

 

▪️विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करणे.

▪️21 व्या शतकातील कौशल्याची रूजवणूक करणे.

 

*तालुकास्तरीय कार्यशाळेचे अध्यक्ष मा.निकील कूमरे विस्तारधिकारी पंचायत समितीचा एटापल्ली प्रमुख अतिथी श्री अशोक कुमार कोवे, गट समन्वयक श्री श्री दसरू पुगाटी श्री बेडके सर हेमंत शेंडे ,प्रशिक्षण सुलभक श्री अशोक कोवे श्री राकेश खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.*

*राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०,राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-२०२३ अन्वये निश्चित करण्यात आलेल्या १५(थिम्स)विषयांतर्गत विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित होते.*

*कार्यशाळेमध्ये* आरोग्य, कृषी,वाहतूक व दळणवळण, दर्जेदार शिक्षण,पर्यावरण पूरक जीवनशैली,नागरी विकास रचना,पर्यटन, संगणकीय विचार,स्वच्छता, अन्न व पोषण,परवडणारी व स्वच्छ ऊर्जा,लिंग समभाव, सांस्कृतिक वारसा,प्रदूषण व डिजिटल सुरक्षा यावर चर्चा करण्यात आली.

 

15 थीम वर आधारित समस्यांची निवड करून 14 ही केंद्रातील मुख्याध्यापक- शिक्षक यांचे गटकार्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीसह सादरीकरण घेण्यात आले.

 

कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री भांडारकर सर यांनी केले