*_स्वामित्व योजना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून देणारी योजना.._*
_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे प्रतिपादन_
दिनांक :- १८/०१/२०२४
गडचिरोली :- भारत सरकार तसेच पंचायत राज मंत्रालय द्वारा राबवलेल्या स्वामित्व योजने अंतर्गत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपूर्ण देशभरात लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड व योजना लाभार्थी कार्ड वितरित करण्यात आले व मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आभासी पद्धतीने लाभार्थ्यांन संवाद साधले.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांना प्रॉपर्टी कार्ड व योजना लाभार्थी कार्ड वितरित कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह गडचिरोली येथे आयोजित करून वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून संबोधित करताना प्रशांत वाघरे बोलत होते की, शेतीमुळे किव्हा त्यांच्या जमिनीमुळे लोकांमध्ये आपसी विवाद व्हायचे, भावा-भावा मध्ये भांडणं व्हायची, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर, शेतीवर बँक मधून लोन घ्यायला अडचण निर्माण व्हायची या सर्व गोष्टीची बाब घेत मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अधिकार, हक्क त्यांना मिळावा त्याकरिता २४ एप्रिल २०२० रोजी स्वामित्व योजनेची अंमलबजावणी केले.
मा. पंतप्रधान यांनी शुभारंभ केलेल्या स्वामित्व योजने मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा अधिकार म्हणजे प्रोपर्डी कार्ड, योजना लाभार्थी कार्ड मिळाल्या नंतर त्यांचे मधील आपसी विवाद, गावातील लोकांमधील भांडण, बँक लोन मिळण्यास होत असलेली अडचण दूर होईल त्यामुळे स्वामित्व योजना शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर कायदेशीर अधिकार मिळवून देणारी योजना आहे असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले.
समोर बोलताना म्हणाले की, गडचिरोली शहरातील गोकुळनगर, रामनगर, इंदिरानगर या भागा मध्ये लोक घर बांधून राहत आहेत परंतु त्यांच्या कडे त्यांच्या जमिनीचे मालकी हक्काचे कोणतेही पुरावे नसून त्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे जिल्हा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना व प्रशासनाला माझी विनंती आहे की त्यांच्या जमिनीचे सर्वे करून त्यांना त्यांच्या जमिनीचे व त्यांच्या मालकी हक्काच्या घराचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे.
याप्रसंगी गडचिरोली चिमुक लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा सर, मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार सर, जिल्हा उप मुख्यकार्यकारी अधिकारी कापसे सर, जिल्हा भूमि अभिलेख अधिकारी सौ.आंबेकर मॅडम उपस्थित होते.