*आमच्या गावात रस्ता कधी होणार जी?* 

12

*आमच्या गावात रस्ता कधी होणार जी?*

 

_एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला गाव: रस्त्याविना संघर्ष आणि विकासाची प्रतीक्षा_

 

____________________________________

स्वातंत्र्याची साडे सात दशके उलटूनही अद्याप अशी अनेक गावे आहेत जिथे पक्क्या रस्त्यांचा पत्ताच नाही. असेच एक गोटाटाला नावाचे गाव एटापल्ली तालुक्यात आहे. या गावात जायला पक्के रस्तेच नसल्याने गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे साहेब, आमच्या गावात रस्ता कधी होणार जी ?, असा प्रश्न गोटाटोलावासी विचारत आहेत.

 

 

रस्ते हे विकासाच्या धमन्या समजल्या जातात. सत्यावरून देशाची संकल्पना ठरविली जाते, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनचे स्वप्न बघणाऱ्या देशात नागरिकांना जायला साधा रास्ता नाही, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंही लोकांना रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशात दरवर्षी कोट्यवधीचा खर्च रस्त्यांच्या बांधकामावर होतो. अनेक ठिकाणी सिमेटीकरणावर डांबरीकरण तर काही ठिकाणी रस्त्यावर रस्ता तयार करून निधीची उधळपट्टी केली जाते. मात्र, आदिवासीबहुल असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सारखेडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गोटेटोला या गावात स्वातंत्र्योत्तर काळापासून रस्ताच

झाला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे

 

एटापल्ली तालुक्यातील सरखेडा ग्रामपंचायतीच्या पश्चिमेस ३ किमी अंतरावर नदीच्या किनाऱ्याजवळ घनदाट जंगलात गोटाटोला हे लहानसे गाव आहे. या गावात २९ कुटुंब राहत असून त्यांची लोकसंख्या जवळपास १२५ च्या वर इतकी आहे. परंतु अजुनही या गावी जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावकन्यांना जंगलातून तीन किलोमीटरच्या पायवाटेने आवागमन करावे लागत आहे. यासोबतच या दुर्गम गावात शासनाच्या पायाभूत सुविधाही पोहोचल्या ससल्याने नागरिकांची फरफट होत आहे.

एकीकडे आवश्यकता नसतानाही अनेक रस्त्यांच्या कामांचा सपाटा सुरू आहे तर दुसरीकडे गावापर्यंत जाण्यास मार्ग नसल्याने आश्चर्य व्यक्त होत

आहे.

 

अनेक वर्षांपासून गावाला रस्ता मिळावा याकरिता ग्रामस्थ शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे उंबरठे झिजवित आहेत. पण कुणीही दखल घ्यायला तयार नसल्याने नागरिकांची समस्या कायम असल्याने रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधीनी नजरेतून हरविलेल्या गोटेटोला गावाकडे लक्ष देऊन विकास साधण्याकरिता पुढाकार घ्यावा, अशी

मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

 

*शिक्षणासाठी जावे लागते जंगलातून*

 

• या गावात अद्याप अंगणवाडी इमारत आणि शाळाही नसून येथील बालकांना खडतर जंगलमार्गे प्रवास करून सरखेडा या गावी जावे लागते. त्यात आरोग्याची कोणतीही सुविधा नसल्याने गावात कुणी आजारी पडल्यास बैलबंडीने, सायकलीने सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जारावंडीच्या दवाखान्यात आणले जाते. अशा अनेक समस्या या गावाच्या पावलीलाच पुजलेल्या आहेत