*काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते सोलह प्रहर नाम संकीर्तन कार्यक्रमचे उदघाटन…!*

10

*काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार यांचा हस्ते सोलह प्रहर नाम संकीर्तन कार्यक्रमचे उदघाटन…!*

 

मुलचेरा : येथील बंगाली बांधवांची लोकसंख्या जास्त असल्याने मुलचेरा तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीनगर येथे सार्वजनिक श्रीश्री राधाकृष्ण भजन मंदिरकडून सोलह प्रहर नाम संकीर्तन कार्यक्रम आयोजित केले आहे.

 

सोलह प्रहर नाम संकीर्तन कार्यक्रमाचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांचा हस्ते करण्यात आली.त्यावेळी कंकडालवार मंदिरास विधिवत पूजन करत आशिर्वाद घेतले.

 

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडूदे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी प्रार्थना केले.अजय कंकडालवार यांनी उदघाटन केले नंतर येथील भाविकांची व नागरिकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतले.

 

यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातील भाविक,स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.