*_औद्योगिक विकासास चालना देणारा प्रकल्प:.. मा.खा.अशोकजी नेते यांचे जनसुनावणी त प्रतिपादन_*
*_गडचिरोलीतील कोनसरी येथे लॅयड्सच्या लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी जनसुनावणी संपन्न.._*
गडचिरोली, २३ जानेवारी २०२५:
कोनसरी येथे लॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लोहखनिज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज (२३ जानेवारी) प्रकल्प स्थळी जनसुनावणी आयोजित केली. या महत्त्वपूर्ण जनसुनावणी कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
या जनसुवणीला माजी
खासदार अशोकजी नेते यांनी या प्रकल्पाबाबत विचार मांडताना म्हणाले गडचिरोलीचा कायापालट:व मागासलेला जिल्हा म्हणून ओळख पुसत गडचिरोली जिल्हा आता विकासाचे नवे मॉडेल बनेल, असे सांगत नेते यांनी या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचा पुनरुच्चार केला की, गडचिरोली जिल्हा भविष्यात “पोलाद सिटी” म्हणून ओळखला जाईल. प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील व गडचिरोली जिल्ह्याचा औद्योगिक विकास वेगाने होईल, असे ते म्हणाले.
पुढे बोलत लाईट्स मेटल्स प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीचे प्रतीक असून, पर्यावरण व जैवविविधतेचे रक्षण करून प्रकल्प शाश्वत विकासाला प्रोत्साहन देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत
या प्रकल्पाच्या यशामुळे गडचिरोली जिल्हा देशाच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे दिसेल, अशी आशा व विश्वास व्यक्त करण्यात आला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
या जनसुनावणीसाठी लॅयड्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकल्पाच्या प्रभावाखालील नागरिकांचा सहभाग:
कोनसरी व आसपासच्या गावांतील नागरिकांनी या सुनावणीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या विचारांची मांडणी केली. पर्यावरण, रोजगार व प्रकल्पाच्या परिणामांबाबत त्यांनी आपले मत मांडले.
लॅयड्स प्रकल्पाच्या विस्तारीकरणात स्टील प्लांटची क्षमता 2 बाय 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष (ग्राईंडिंग युनिट), 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष (थिकनिंग फिल्ट्रेशन युनिट), 2 बाय 4 दशलक्ष टन प्रतिवर्ष (आयरन ओर पेलेट प्लांट), तसेच 4.5 दशलक्ष टन क्षमतेचा इंटिग्रेटेड स्टील प्लांट उभारण्याचा प्रस्ताव आहे.