मेट्रो स्टेशनवर लुटा मकर संक्रांतीचा आनंद

240

सिताबर्डी स्टेशनवर गाण्याची, शॉपिंगची, खाण्याची मेजवानी
• धावत्या मेट्रो ट्रेन मध्ये महिला करू शकतात हळदी कुंकूचा कार्यक्रम

नागपूर११ जानेवारी : प्रवाशांच्या सोइ करिता महा मेट्रोच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत असून याच पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या निमित्याने मेट्रो स्टेशन येथे कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. महा मेट्रोद्वारे मेट्रो ट्रेन मध्ये सायकल विथ मेट्रो ,सेलिब्रेशन ऑन व्हील्, फिडर सारख्या अनेक विविध उपाय योजना महा मेट्रो तर्फे प्रवाश्यांकरता केल्या आहेत. या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे.

दिनांक १३ जानेवारी पासून महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे स्टॉल्स मेट्रो स्टेशन येथे लावण्यात येणार आहेत. यात खाण्याकरता विविध प्रकारचे, तसेच शॉपिंग करता देखील स्टॉल असतील. या शिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरण पूरक वस्तू देखील विक्रीला असतील. नागपूरकरांनी राईड करून या सर्व सोईंचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या योजने अंतर्गत मेट्रो ट्रेन मध्ये महिला मकर संक्रातीच्या निमित्याने मेट्रो ट्रेन मध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम करू शकतात. ही अनोखी भेट महा मेट्रोच्या वतीने महिलाकरिता योजिली आहे यामुळे जास्तीत जास्ती नागरिकांनी या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने नागरिकांना केले आहे.