*दाओस कराराअंतर्गत जिल्ह्यातील हजारो तरुणांना मिळणार रोजगार* 

13

*दाओस कराराअंतर्गत जिल्ह्यातील हजारो तरुणांना मिळणार रोजगार*

 

*मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व उद्योग मंत्र्यांचे माजी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी मानले आभार*

 

*गडचिरोली जिल्ह्यासाठी जेएसडब्ल्यू अंतर्गत 3 लाख कोटी तर कल्याणी समूह अंतर्गत 5 हजार कोटींच्यां कराराचे केले स्वागत*

 

*गडचिरोली जिल्ह्यात उद्योग निर्मितीचा आपण रोवलेला पाया मजबूत होत असल्याने व्यक्त केले समाधान*

 

*दिनांक 22 जानेवारी गडचिरोली*

 

*राज्याचे लोकप्रिय तडफदार मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी दाओस येथे जेएसडब्ल्यू अंतर्गत 3 लाख कोटी तर कल्याणी समूह अंतर्गत 5 हजार कोटींचा “महाकरार” हा जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा असून यातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे जिल्हा वासियांच्या वतीने देवेंद्रजींचे व उद्योगमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होडी यांनी या माध्यमातून केले आहे.*

 

*या करारा अंतर्गत जीएसडब्ल्यू च्या वतीने नागपूर व गडचिरोली करिता तीन लाख कोटी स्टील व इतर क्षेत्रासाठी गुंतवणूक करीत असून त्यातून किमान दहा हजार रोजगार उपलब्ध होणार आहे तसेच कल्याणी समूहाच्या वतीने करण्यात आलेल्या पाच हजार कोटींच्या करारातून 4 ००० लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे यासोबतच गडचिरोली जिल्ह्यात विविध कंपन्या उद्योग उभारणीसाठी पुढे येत असून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना भविष्यात मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारचे त्यांनी आभार मानले आहे.*

 

*गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू व्हावे यासाठी आपण उद्योग क्रांतीच्या माध्यमातून पाया ठेवला होता. तो पाया आता भक्कम होत असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होत असल्याने आपण केलेल्या प्रयत्नांना आता यश मिळत असल्याचे ते म्हणाले.*