_*”ब्रह्मपुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं.४ विद्यानगर बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न”*_

33

_*”ब्रह्मपुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रं.४ विद्यानगर बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न”*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांची प्रमुख उपस्थिती*_

 

 

ब्रह्मपुरी/प्रतिनिधी

_शिक्षण विभाग, पंचायत समिती ब्रह्मपुरीतर्फे आयोजित “बिटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरी नगरपरिषदचे प्रथम नगराध्यक्ष तथा नेवजाबाई हितकारिणी शिक्षण संस्था ब्रम्हपुरीचे सचिव अशोकजी भैया यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ. देवेंद्रजी कांबळे उपस्थित होते._

_*बिटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव समारंभाला माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांची विशेष उपस्थिती होती.* कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र घुबडे गटविकास अधिकारी, पंचायत समिती ब्रह्मपुरी, मयूर लाडे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी, अँड. दिपाली मेश्राम माजी सदस्य, जिल्हा परिषद चंद्रपूर, डॉ. नितीन उराडे माजी नगरसेवक न.प. ब्रम्हपुरी, प्रभाकर सेलोकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रम्हपुरी, वकार खान ब्रम्हपुरी, प्रशांत डांगे ब्रम्हपुरी, प्रकाश पगाडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ब्रम्हपुरी क्र. ४, देवीदास बगमारे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ब्रम्हपुरी क्र. ४, स्मिताताई उराडे उपाध्यक्ष केंद्र प्रमुख केंद्र ब्रम्हपुरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते._

_सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्रह्मपुरी क्रमांक ४ येथे करण्यात आले होते. विविध मान्यवर, प्रशासकीय अधिकारी व स्थानिक नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला गौरव प्रदान केला._

_कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने व विजेत्यांना पुरस्कार वितरणाने झाली. “एकच आस, एकच ध्यास – विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास” हे घोषवाक्य पूर्णत्वास नेण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला._