नवोदय विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागु करा

109

नवोदय विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन लागु करा

खासदार अशोक नेते यांची लोकसभेत मागणी

नियम 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत निवेदन

गडचिरोली :- दि. 9 मार्च
देशातील नवोदय विद्यालयात कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 2005 च्या पूर्वी व त्यानंतरही पेन्शन च्या सुविधेपासून वंचित करण्यात आले आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पेन्शन लागू करण्याची मागणी केलेली आहे. मात्र शासनाकडून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नवोदय च्या कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे केंद्र सरकारने लक्ष देऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यासाठी उचित निर्णय घ्यावा अशी मागणी गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज दि 9 मार्च 2021 रोजी नियम 377 अधीन सूचनेनुसार लोकसभेत केली व या महत्वपूर्ण मागणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्र हा अतिमागास, आदिवासी बहुल, अविकसित व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखल्या जातो. तथा शैक्षणिक दृष्टीने सुध्दा हा क्षेत्र मागासलेला आहे त्यामुळे येथील गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून व विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण घेता यावे, या हेतूने आदिवासी बहुल गडचिरोली- चिमूर या लोकसभा क्षेत्रात पुन्हा एका नवोदय विद्यालयाची निर्मिती करण्यासाठी शासन स्तरावर उचित निर्णय घेण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी नियम 377 अधीन सूचनेनुसार आज लोकसभेत केली. व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने या महत्त्वाच्या प्रश्नांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेतले.