*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते वार्षिक मतुआ धर्म मिलन महोत्सव कार्यक्रमचे उदघाटन…!*
मुलचेरा : तालुक्यातील मथुरानगर येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री श्री हरी मंदिर मथुरानगर येथील पूर्ण ब्रम्ह भगवान श्री श्री हरिचाॅं ठाकूर वार्षिक मतुआ धर्म मिलन महोत्सव कार्यक्रम आयोजित केले आहे.आयोजित कार्यक्रमाची आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांचा हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.तसेच कार्यक्रम ठिकाणी अन्नदान कार्यक्रमही आयोजित केले आहे.
यावेळी आलापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जू पठाण,अमर साना,अजय राय,मनोज राय, रिक्की हलदर,मादाव मिस्त्री,सलेन,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील भाविक तसेच गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.