*दिव्यांगाच्या हक्कासाठी सदैव लढा देणार*- खासदार डॉ. नामदेव किरसान यांचे प्रतिपादन
*दिव्यांग मुला -मुलींच्या क्रीडा स्पर्धेचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते उदघाट्न*
गडचिरोली :: दिव्यांगांना रोगारच्या संधी उपलब्ध करून देऊन समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी आपणास सदैव प्रयत्न करू असे प्रतिपादन खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले, समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गडचिरोली व दिव्यांगांच्या विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग मुला -मुलींच्या क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात उदघाट्क म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हूणन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, विशेष अतिथी म्हणून काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे, गडचिरोली पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार, शहर काँग्रेस अध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेल काँग्रेस अध्यक्ष रजनीकांत मोटघरे सह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनात पुढे बोलले की, दिव्यांगाणा स्वावलंबी बनविणे हा आपला उद्देश असून त्या करीता आपले प्रयत्न चालू आहे, दिव्यांगांच्या विविध अडचणीना घेऊन आपण संसदेत आवाज उठवीला असून या पुढेही ते कार्य चालू असेल इतकेच नाही तर शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना ह्या जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत पोहचविन्याचा आपला माणस असल्याचे त्यांनी व्यक्त केले.