*किसान सभेच्या आंदोलनाने हेडरी इथे सुरु झालंय धान खरेदी केंद्र : कॉ सचिन मोतकुरवार राज्य कौन्सिल सदस्य ऑल इंडिया किसान सभा*
मागील दोन वर्षांपासून हेडरी येथील धान खरेदी केंद्र बंद होत त्यामुळे त्यांना इतर उडेरा सारख्या गावात जाऊन विकावं लागायचं, हेडरी भागातील १६ गावातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होत त्यामुळे याभागातील नागरिक ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्र राज्यच्या नेतृत्वाखाली ९ डिसेंबर रोजी अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळ कार्यलय समोर एक दिवशीय आंदोलन करण्यात आलाय यामुळे हेडरी येथील धान खरेदी केंद्रात धान खरेदी मंजूर होत त्याअनुषंगाने आज दिन २५ जानेवारी २०२५ रोजी हेडरी येथील धान खरेदी केंद्र कॉम्रेड सचिन मोतकुरवार अहेरी विधानसभा प्रमुख भारतीय कम्युनिष्ठ पार्टी यांच्या हस्ते तथा माजी सरपंच कटिया तेलामी , दानू हिचामी रेकणार, दशरथ उसेंडी, आशिष हिचामी, सतीश हिचामी,रैनू हिचामी, लालू लेकामी, भाऊराव कवडो पोलीस पाटील, सुरज जक्कुलवार तसेच अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होतेत यामुळे आता हेडरी भागातील शेतकऱ्यांना उडेरा, किंवा तोडसा सारख्या लांब अंतरावर जाण्याची गरज नसल्यामुळे शेतकरी आनंदित झाले तसेच कॉ सचिन मोतकुरवार यांनी शेतकऱ्यांना आव्हान केलेत कि जास्तीत जास्त शेतकरी हेडरी भागातील येऊन धान विक्री करून लाभ घ्यावा आणि काही समस्या असल्यास ऑल इंडिया किसान सभा (AIKS) ला सम्पर्क करावे असे सांगितले तसेच TDC अहेरी श्री प्रशांत डांगे यांनी पण शेतकऱ्यांना कोणतीच अडचण होणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगितले….