*उद्योजकतेची नवीन संधी*
*घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे ‘सोया-मिल्क’ उद्योग प्रकल्पावर रविवारी एक दिवसीय कार्यशाळा*
चिमूर विधानसभेत शेतकरी व बेरोजगारी यांची समस्या अतिशय बिकट आहे, यावर उपाय म्हणून कोलारा गेट, ताडोबा-सातारा येथे घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली असून याअंतर्गत नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत असतात.
दुधाच्या वाढत्या किमती, दुधातील भेसड, दुध उत्पादन वाढावे यासाठी हार्मोनच्या इंजेक्शन चा होणारा गैरवापर यामुळे घरोघरी लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. यावर उपाय म्हणून अगदी कमी खर्चात, घरच्या घरी, दररोज सोयाबीनपासून उच्च प्रतीचे १०० लिटर दुध उत्पादन कसे करावे त्याला मार्केट कुठे आणि कसे करावे यासाठी रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केलेली आहे.
या कार्यशाळेत तज्ञांचे मार्गदर्शन होणार असून प्रात्याक्षित करून दाखविण्यात येतील, तसेच सोया-मिल्क चा लहान व मोठा प्रकल्प कसा उभारायचा, त्यासाठी शासनाच्या सवलती, सूट, अनुदान कशे मिळवावे यावर मार्गदर्शन होणार असून प्रत्येक गावात एक सोया-मिल्क उद्योग उभा राहावा यासाठी संस्थेतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहे. इच्छुकांनी नोंदणी करून या कार्यशाळेला उपस्थित राहावे असे आवाहन घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्राचे मुख्य प्रवर्तक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी केले आहे.