*घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत गट साधन केंद्र, एटापल्ली येथे व्याख्यान सत्र संपन्न*

25

*घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत गट साधन केंद्र, एटापल्ली येथे व्याख्यान सत्र संपन्न*

 

एटापल्ली – दि.24 जानेवारी.

घर घर संविधान या अमृत महोत्सवी तालुकास्तरीय गट चर्चा तद्वतच व्याख्यान सत्र गट साधन केंद्र,पंचायत समिती, एटापल्ली येथे नुकतेच संपन्न झाले.

भारतीय संविधानास 75 वर्षे झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम संपूर्ण देशात साजरा केल्या जात आहे. संविधानाविषयी जनजागृतीस्तव संविधान दिन साजरा करण्यासाठी शासन स्तरावरून वर्षभर प्रत्येक महिन्याला सुचक उपक्रम प्रस्तावित आहेत. माहे- जानेवारी मध्ये संविधानाबाबत गटचर्चा तद्वतच व्याख्यान आयोजनाचे उपक्रम प्रस्तावित होते. दि.24 जानेवारीला गट साधन केंद्र एटापल्ली येथे मोठ्या थाटात संविधान व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी गटचर्चेतून संविधान निर्मिती, त्याचे महत्त्व याबद्दल कथाकथन, घटनात्मक अधिकार यावर सखोल मार्गदर्शन वक्त्यांकडून करण्यात.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. हृषिकेश बुरडकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती एटापल्ली हे होते. तर शिक्षण विस्तार अधिकारी मा. निखिल कुमरे, विनायक पुरकलवार होते. कार्यक्रमाला मा. कोडापे साहेब कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पंचायत समिती एटापल्ली व मा. डी.एच.खोब्रागडे प्रा.शिक्षक बुर्गी हे अभ्यासु वक्ते लाभले होते. याप्रसंगी केंद्र प्रमुख कु. अरूणा बर्लावार , श्री.तेजराज नंदगिरवार , गट साधन केंद्र कार्यालयातील कर्मचारी, बहुसंख्य शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कन्हैया भांडारकर, कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर खोब्रागडे यांनी मांडले तर मान्यवरांचे आभार उपक्रम समन्वयक श्री.अनिल गजबे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.