*एटापल्ली नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना उन्हात तडफडावे लागले* 

9

*एटापल्ली नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना उन्हात तडफडावे लागले*

 

आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एटापल्ली नगरपंचायतीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कॉन्व्हेंटपासून हायस्कूलपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मात्र, नियोजनातील हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना उन्हात बसावे लागल्याने स्थानिक नागरिक आणि पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

कार्यक्रमादरम्यान नगरपंचायतीच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी तंबू (पेंडाल) उभारण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या लहान मुलांना उन्हात बसण्यास भाग पाडण्यात आले. नृत्यसादरीकरणासाठी उभारलेल्या व्यासपीठावरही सावलीची कोणतीही व्यवस्था नव्हती.

 

सकाळी सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 2 वाजेपर्यंत चालला. या दरम्यान, प्रखर उन्हामुळे विद्यार्थी त्रस्त झाले. विशेषतः लहान मुले आणि मुलींची स्थिती अधिकच बिकट होती. काही विद्यार्थ्यांना उन्हाचा अत्यन्त त्रास झाल्याचे दिसले

 

“अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी स्वतःसाठी सोयीसुविधा करून घेतल्या, मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचारही केला नाही. प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी विद्यार्थ्यांना अशी वागणूक देणे योग्य नाही,असे आलेल्या नागरिकाकडून बोलल्या जात होता

 

 

स्थानिक नागरिक आणि पालकांनी नगरपंचायतीच्या या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे नियोजन करताना मुलांच्या आरोग्याचा आणि सोयींचा विचार केला जावा, अशीही मागणी करण्यात येत आहे.