शिवसेना तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या मदतीमुळे गांधीनगर येथील निराधार महिलेचे घराचे स्वप्न होणार साकार

27

शिवसेना तालुका प्रमुख गौरव बाला यांच्या मदतीमुळे गांधीनगर येथील निराधार महिलेचे घराचे स्वप्न होणार साकार

 

मुलचेरा –

मुलचेरा तालुक्यातील गांधीनगर येथील कांचन मंडल हीच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची घरात अठराविश्व दारिद्र्य दोन लहान लेकर पाठीवर त्यात राहण्यासाठी निवाऱ्याची धड व्यवस्था नाही पावसाळ्यात झोपडीत चिखलाचे साम्राज्य अशा परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कांचन ला निवाऱ्याची समस्या सतावत होती.. त्यात घरकुलाचा लाभ तिच्या पदरात पाडून देण्यात ग्रामपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरले. अखेर या निराधार विधवा भगिनीला छत्रछायेचा आधार देण्यासाठी धावले ते शिवसेना तालुका प्रमुख गौरव बाला यांचे हात.

 

कांचन मंडल हिच्या हलाखीच्या परिस्थितीची आपबिती कळताच गौरव बाला यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन कांचन मंडल हीच्या घरी भेट दिली व तिला चार खोलीचे स्लॅब चे घर स्व खर्चाने बांधून देण्यासाठी मदतीचा हात दिला अन् तिच्या चेहऱ्यावर आपल्याला व दोन लहान लेकरांना निवारा मिळत असल्याचा आनंदही चेहऱ्यावर ओसंडला ..

 

कांचन मंडल हीच्या नवीन घराच्या पायाभरणीसाठी 27 जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, मुलचेरा तालुका प्रमुख गौरव बाला यांनी उपस्थिती लावली व विधिवत पूजा अर्चना केली यावेळी कांचन मंडल यांना शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनीही आर्थिक मदतीचा धीर दिला यावेळी शिवसेना नेते आष्टी ग्रामपंचायतीचे सदस्य कपिल पाल, युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते संजीव पोद्दार, कालीनगर शिवसेना प्रमूख अमरीश ढाली, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सत्यपाल कुत्तरमारे, शिवसेना नेते अविनाश पुच्छलवार,मुरारी देवनाथ गांधीनगर येथील प्रतिष्ठित नागरीक केशव मंडल, रंजन बिश्वास, हर्षिद बिश्वास, तुषार मंडल, हिरेन मंडल, समरेश रॉय प्रविण मंडल, मनोरंजन बैरागी, भाविक साना, संजय हलदर, विनोद बीश्वास, राजीव मंडल आदी उपस्थीत होते.