गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
वासुदेव शेडमाके (जिल्हाप्रमुख – गडचिरोली जिल्हा), रामकृष्ण मडावी (जिल्हा समन्वयक-गडचिरोली जिल्हा), विजय पवार (सहसंपर्कप्रमुख गडचिरोली जिल्हा), राजू अंबानी (जिल्हा संघटक- गडचिरोली जिल्हा), अरविंद कात्रटवार (उपजिल्हाप्रमुख – गडचिरोली), घनशाम कोलते (तालुकाप्रमुख – गडचिरोली शहर), कुणाल कोवे (तालुकाप्रमुख – गडचिरोली ग्रामीण), अब्दुल शेख (शहरप्रमुख – गडचिरोली शहर), कृष्णा वाघाडे (उपशहरप्रमुख – गडचिरोली शहर), ज्ञानेश्वर वाघमारे (तालुका संघटक-गडचिरोली तालुका), गजानन नैताम (तालुका समन्वयक – गडचिरोली तालुका), मनोज पोरटे (तालुकाप्रमुख – चामोर्शी शहर), दीपक दुधबावरे (तालुकाप्रमुख – चामोर्शी ग्रामीण), बंडू नैताम (शहरप्रमुख- चामोर्शी शहर), अंकिम साबनवार (तालुका संघटक- चामोर्शी तालुका), सुभाष करणे (तालुका समन्वयक- चामोर्शी तालुका), दिलीप सुरपाम (उपजिल्हाप्रमुख – अहेरी विधानसभा), प्रफुल्ल येरने (तालुकाप्रमुख- अहेरी विधानसभा), टिल्लू मुखर्जी (तालुकाप्रमुख मुलचेरा तालुका), अक्षय पुंगाटी (तालुकाप्रमुख-इटापल्ली तालुका), राजेंद्र लानजेकर (सल्लागार-गडचिरोली जिल्हा).