जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. गीता हिंगे यांचा सामाजिक वनिकरण विभागांनी केला सत्कार

185

जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. गीता हिंगे यांचा सामाजिक वनिकरण विभागांनी केला सत्कार

दि.८ मार्च २०२१ जागतिक महिला दिना निमित्ताने सामाजिक वनिकरन विभागातर्फे सामाजिक कार्यकर्त्यां आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा मा.गिताताई हिंगे यांचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला त्या प्रसंगी कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा मा.एम.वी.टेकाडे मॅडम साहाय्यक वनसंरक्षक अधिकारी , सत्कार मुर्ती आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गिताताई हिंगे, प्रमुख अतिथी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री नितीन हेमके साहेब व डाॕ. अमित सेठीया सर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथींनी आधारविश्व फाऊंडेशन च्या संपूर्ण कार्याची सविस्तर अशी माहीती दिली. प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा हा आधारविश्व फाऊंडेशन आज आपल्या कार्यामुळे प्रत्येक घराघरात पोहचलेला आहे. प्रत्येक वेळी नवनविन उपक्रम घेवून एक आदर्श निर्माण करणारा प्रेरणा स्थान झालेला आहे असे मा.हेमके साहेबांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं. सत्कार मुर्ती गिताताई हिंगे यांनी आपल्या फाऊंडेशन ची बीजे कशी रोवली व आपल्या सहकार्यांच्या मदतीने ह्या फाऊंडेशन साठी सतत कार्यरत असलेल्या मा गिताताई यांच्याविषयी बोलतांना सेठीया सरांनी गिताताई यांनी केलेल्या संघर्षाविषयी माहीती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा.टेकाडे मॕ.यांनी सुद्धा या कार्यक्रम प्रसंगी आपल्या जीवन कार्याची माहीती दिली.तसेच मी सुद्धा आज पासून या फाऊंडेशन सदस्य होणार व कुठेही असली तरी आपल्या फाऊंडेशन ला वेळोवेळी जमेल तसे सहकार्य करणार याची ग्वाही दिली.या प्रसंगी आधारविश्व च्या सदस्या सौ.स्नेहा आखाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की अजून खूप शिखर गाठायचे आहे आहे ही तर आमच्या फाऊंडेशन ची सुरवात आहे.दिलशाद नाथानी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की आमच्या आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा मा. गीताताई हिंगे यांच्यात खास गोष्ट अशी आहे की त्या सर्व सदस्यांना घेऊन चालतात. कोरोनामुळे वारंवार बैठका शक्य होत नाही तरी सर्वांशी वेळोवेळी संपर्क साधून कार्यक्रमाचे नियोजन करतात. क्वचित प्रसंगी रागावतात सुद्धा. आणी म्हणूनच आधारविश्व फाऊंडेशन ने इतक्या कमी दिवसात नावलौकिक मिळवले. या वेळी आधारविश्व च्या उपाध्यक्षा प्राचार्या विना जंबेवार मॅडम ,सदस्या प्रा. विजया मने मॅडम, शहनाझ शेख, लीला डांगे मॅडम, सुनीता आलेवार आणि सर्व सदस्या उपस्थित होत्या.