*राष्ट्रीय शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र*- *माजी आमदार दिपकदादा आत्राम*

15

*राष्ट्रीय शिबिर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र*- *माजी आमदार दिपकदादा आत्राम*

 

*आलापली येथील स्व. लक्ष्मीबाई कला, विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारा मौजा मलमपल्ली (बुर्क) येथे सात दिवसीय आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते पार पडले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून महाविद्यालय विविध गावात शिबिराचे आयोजन करत असतात. यात विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार, बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण करणे व अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा अशा प्रकारचे प्रतिपादन दिपकदादा आत्राम यांनी केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कार्य. प्राचार्य प्रा. अमित कोहपरे, प्रमुख अतिथी म्हणून विशालजी रापेल्लीवार अध्यक्ष त. मु. स. ग्रा. पं. नागेपल्ली, योगेश्वरी मोहुर्ले माजी सदस्या पंचायत समिती अहेरी,ग्राम पंचायत सदस्य संदीप पाटील,ग्राम पंचायत सदस्या सौ ममता मडावी, दिवाकर जी. मडावी माजी सरपंच नागेपल्ली, सौ चव्हाण मॅडम जि. प. प्रा. शाळा मलमपल्ली ई. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधीकारी प्रा. अजय बारसागडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश गर्गम तर आभार प्रा. यामिनी बोधलकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.*