*_दिल्ली येथे संसदीय संकुल विकास परि योजनेची बैठक संपन्न_*
*_या बैठकीत मा.खा.तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती.._*
दिनांक: ३० जानेवारी २०२५
दिल्ली येथे संसदीय संकुल विकास परि योजनेची बैठक दिं. २९ जानेवारी २०२५ ला नई दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संसदीय संकुल विकास परि योजना यावर सविस्तर विस्तृत चर्चा करत ही बैठक राष्ट्रीय संगठन महामंत्री आदरणीय श्री.बी.एल.संतोषजी व राष्ट्रीय संगठक आदरणीय श्री. वी.सतीश जी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.
या संसदीय संकुल विकास परियोजने संबंधीत महत्वपूर्ण बैठकीत जनजातीय समाजाला सशक्तिकरण आणि आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मजबूत करण्यासाठी या बैठकीला सविस्तर चर्चा झाली.
यावेळी बैठकीला प्रामुख्याने मान. बि.एल संतोषजी भाजपा राष्ट्रीय संगठन महामंत्री,वि. सतीशजी -राष्ट्रीय संघटक, भाजपा, समीर उरावजी – राष्ट्रीय अध्यक्ष भाजपा जनजाती मोर्चा, अशोकजी नेते – भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, खा.गजेंद्रजी पटेल – राष्ट्रीय महामंत्री,गजानन डांगेजी व इतर जनजाती मोर्चा मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.