*सिंदेवाही येथे अखिल भारतीय गानली समाज संघटनेची सभा संपन्न*
चंद्रपूर दि.30:- अखिल भारतीय गानली समाज संघटना तालुका शाखा सिंदेवाही ची सर्वसाधारण सभा श्रवण सेलिब्रेशन लान सिंदेवाही येथे,विलास बल्लावार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेकरिता प्रमुख पाहुणे,अशोक संगीडवार,चंद्रपूर,किशोर संगिडवार, सावली,उपस्थित होते.चंद्रशेखर चेन्ने यांनी प्रास्ताविक द्धारे सभेच्या आयोजनाबाबतचे उद्देश सांगितले. अशोक संगिडवार,किशोर संगीडवार, म्हणाले की,सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे.याकरिता संघटन शक्तीचा वापर करणे आवश्यक आहे.असे एखादे महत्त्वाचे कार्य साध्य करावयाचे असल्यास राजकीय पाढबळ असणे सुद्धा गरजेचे आहे.त्यामुळे तालुका संघटन मजबूत करून अखिल भारतीय गानली समाज जिल्हा समितीवर तालुक्याचे 2 -3 प्रतिनिधी निवड करून पाठवण्याबाबत सांगितले. तसेच विकासात्मक कार्यक्रम योजना, प्रभावीपणे राबविण्याकरिता एक सक्षम व क्रियाशील नेतृत्व मिळावे याकरिता माजी विरोधी पक्षनेते आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे अखिल भारतीय गानली समाज संघटनेचे नेतृत्व सोपवण्यात यावे,असे सर्वांनुमते ठरविण्यात आले.या कार्यक्रमाला मनोज चेन्ने,विपिन पोरेट्टीवार,संजय पुपरेडडीवार,सुरेश कोतपल्लीवार,सागर ईटकेलवार,रवींद्र संगिडवार,बाबुराव आयतुलवार,मनोज बल्लावार,नंदकुमार चन्ने,अमोल मल्लेलवार,राजेंद्र गद्देवार, वैभव रत्नावार,पंकज मददावार,सौरभ तेप्पलवार,प्रवीण वरगंटीवार,प्रशांत रत्नावार,साधना बाल्लावार,भारती बाल्लावार,पिंकी पोरेडडीवार,वैशाली पुपरेडडीवार,सोनाली चन्ने,अमोल चन्ने शोभाताई चन्ने,यांचेसह सिंदेवाही तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.सभेचे संचलन अनिल बललमवार यांनी केले.तर आभार चंद्रशेखर चन्ने यांनी केले.