*अंतरगाव टोला येथे श्री संत साईबाबा व श्री संत गजानन महाराज प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा*
चंद्रपूर दि.30:- सार्वजनिक हनुमान मंदिर,(अंतर्गत टोला)तालुका- सावली जिल्हा- चंद्रपूर येथे श्री संत साईबाबा व श्री संत गजानन महाराज प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आलेला. प्रमुख पाहुणे म्हणून मा.खा.डॉ.नामदेवराव किरसान,आ.विजयभाऊ वडेट्टीवार,श्री जितेंद्र धात्रक,युवा कार्यकर्ता,गडचिरोली हे उपस्थित राहणार आहे.कार्यक्रम शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी दुपारी 12.00 वा.कलश घटस्थापना दुपारी 1.00 वा.गुरुदेव सेवा मंडळ अंतरगांव टोला,यांचे भजन,दुपारी 2.00 वा.श्री संत साईबाबा व संत श्री गजानन महाराज यांची पालखी शोभायात्रा व कलश यात्रा,आणि गुरुदेव सेवा मंडळ,हळदा यांचा वारकरी भजन कार्यक्रम,सायं.7.00 वा.पालखी समारोप व महाप्रसाद,रात्री 8.00 वा. स्वर संगीत म्युझिकल नाईट द्वारे प्रस्तुत भक्ती गीताचा कार्यक्रम,दि.2 फरवरी सकाळी 7.00 वा.संत श्री गजानन साईबाबा व संत गजानन महाराजांच्या अभिषेक सोहळा व होमहवन कार्यक्रम दुपारी 2.00 वाजता ह.भ.प.गंगाधरजी चुधरी महाराज,डोंगरगाव यांचा कीर्तन व गोपाल काला,सायं.5.30 वा.महाप्रसाद लाभ घ्यावा,व कार्यक्रमाला जास्तीत जास्त गावकरी मंडळी व इतर मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन हनुमान मंदिर देवस्थान समिती व समस्त गावकरी,अंतर्गत टोला यांनी केले आहे.