*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डॉ.सोनल कोवे यांचा प्रवेश* 

26

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात डॉ.सोनल कोवे यांचा प्रवेश*

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी कॅबिनेट मंत्री व आमदार मा.डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.सोनल कोवे महिला काँग्रेसच्या नेत्या व विविध पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ नाकाडे, प्रदेश महासचिव युनूसजी शेख,युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी , तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.