*_हळदी-कुंकू स्नेहसोहळा: कुरखेडा.._*
*_”महिला सबलीकरणासाठी भाजपा सरकार कटिबद्ध” – मा.खा.अशोकजी नेते यांचे प्रतिपादन…_*
कुरखेडा: दिं. ३० जानेवारी २०२५
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने कुरखेडा येथे भव्य हळदी-कुंकू व स्नेह मिलन सोहळा संस्कार पब्लिक स्कूल कुरखेडा येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.
या समारंभाचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृष्णाजी गजबे, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, तालुकाध्यक्ष चांगदेवजी फाये, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. उमेशजी वालदे, नगरसेवक सागर निरंकारी,म.जि.महामंत्री प्रितीताई शंभरकर, अर्चना ढोरे, जयश्री मडावी, रुपाली कावडे,जागृती झोडे, लता लाटकर,शितल लांजेवार, रंजु मेश्राम, कल्पना मांडवे, चित्राताई गजबे, शोभा दहीकर, ज्योती बागडे,आत्राम ताई, यांच्यासह महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
या हळदी कुंकु कार्यक्रमात माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांनी उपस्थित महिला भगिनींना मार्गदर्शनात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि सबलीकरणासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी मैलाची योजना ठरली आहे. भाजपा सरकार महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत आहे.” असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मा.खा.अशोकजी नेते यांनी केले.
त्यांनी पुढे बोलत भाजपाचे सरकार महिलांच्या उन्नतीसाठी जसे बोलते तसे कृतीतून दाखवते, त्यामुळे महिलांनीही या सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन मा.खा.नेते यांनी करत या ठिकाणी हळदी कुंकू व स्नेह मिलन सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा केवळ परंपरा जोपासणारा कार्यक्रम नव्हता, तर समाजातील महिलांच्या सन्मानाचे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन मा.खा.अशोकजी नेते यांनी केले.
हळदी कुंकू व स्नेह मिलन कार्यक्रमात महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने ता.कुरखेडा येथे आयोजित हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला!