_*निलज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन*_

35

_*निलज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन*_

 

_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न*_

 

ब्रम्हपुरी/

_प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधुन निलज येथे २६ जानेवारी ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज च्या वतीने शालेय सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या देशभक्तीपर कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कला -गुणांना वाव देने तसेच देशाच्या संविधान दिनाचे महत्व , इतिहास विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यात आले. लहान मुलांना संगीत, नृत्य, नाटक, कला आणि साहित्य यासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम एक व्यासपीठ प्रदान करतात. हे सण विद्यार्थ्यांमध्ये समाजाची भावना निर्माण करण्यास आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला उत्तेजन देण्यासही मदत करतात व अश्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते.वगावातुन एक विद्यार्थी घडू शकतेअसे मत माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी व्यक्त केले._

_ब्रम्हपुरी तालुक्यातील निलज येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शालेय सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या *कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.‌* यावेळी कार्यक्रमाचे. अध्यक्ष. प्रभाकरजी सेलोकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी,उपस्थित होते._

_यावेळी कार्यक्रमाचे. सहउद्घाटक.अन्नाजी ठाकरे बाबुसाहेब रुई, उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे उपाध्यक्ष.हेमंत ठाकरे सरपंच निलज,शंकर कोपुलवार उपसरपंच निलज,उत्तमजी बनकर ग्रा.प.सदस्य.रुई,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे.चंद्रगुप्तजी चहांदे अध्यक्ष तं.मु.स.निलज,अशोक भुते मा.अध्यक्ष.शा.व्य.स.निलज, विश्वनाथ नखाते, सुरेश मैंद पो.पा.निलज,मनोहर राहाटे ग्रा.प.सदस्य.निलज,कैशव मैन्द, भोजराज राऊत, अनिल शिऊरकार, नारायण मैश्राम ग्रा.प.सदस्य,संजय भरै, गुरुदेव सोंदरकर, युवराज ढोरे,देवानंद दमके,सुचित्रा दमके,वासनिक मॅडम मुख्याध्यापक,अश्विनी मांडरे,माधुरी मांडरे ग्रा.प.सदस्या,कल्पना मांडरे ग्रा.प.सदस्या,राहुल मैंन्द पत्रकार,छत्रपती पेंदाम, हर्षवर्धन चौधरी पुरुषोत्तम ठाकरे,कुनाल मैन्द, गजानन वैलथरे,यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते._

_या कार्यक्रमामध्ये गावातील लहान मुलांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. गावातील जनतेने त्यांच्या कलागुणांना दाद देत प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निलज, च्या सर्व शिक्षक वृंद व गावकरी यानी अथक परिश्रम घेतले._