गडचिरोलीत दिव्यांगांच्या आंदोलनाला यश, अतिरिक्त २० कोटींच्या निधीचे आश्वासन

19

गडचिरोलीत दिव्यांगांच्या आंदोलनाला यश, अतिरिक्त २० कोटींच्या निधीचे आश्वासन

दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील – अप्रव भैसारे

 

गडचिरोली जिल्ह्यात दिव्यांगांच्या समस्या आणि हक्कांसाठी सुरू असलेल्या प्रजासक्ताक दिनी लक्षविधित आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. जिल्ह्यासाठी फक्त दिव्यांगांसाठी २० कोटी रुपये अतिरिक्त निधी मंजूर करण्याचे तसेच विशेष अॅम्ब्युलन्स सेवा आणि दिव्यांग भवन स्थापन करण्याचे आश्वासन सहपालकमंत्री आशिष अग्रवाल यांनी दिले आहे. आंदोलनस्थळी जिल्ह्याचे आमदार मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते जिल्हाधिकारी अविनाश पांडा पोलीस अधीक्षक निलोप्त यांनी भेट दिली.

आंदोलन मागे घेताना दिव्यांग आंदोलनाचे प्रमुख नेते अप्रव भैसारे यांनी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे स्वागत केले. मात्र, राज्यातील सर्व दिव्यांगांना ६०००/- रुपये मासिक पेन्शन मिळवून देण्यासाठी लढा सुरूच राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला.

भैसारे यांनी सांगितले की, “गडचिरोलीसाठी मिळालेला निधी ही मोठी उपलब्धी आहे, परंतु संपूर्ण राज्यातील दिव्यांगांच्या न्यायहक्कांसाठी आम्ही मागे हटणार नाही. पेन्शन वाढीचा प्रश्न हा प्रत्येक दिव्यांगाचा हक्क आहे, आणि तो मिळवण्यासाठी संघर्ष सुरूच राहील.” आंदोलनास प्रहार जिल्हाध्यक्ष निखील धार्मिक अरविंद धकाते अनंता भोयर गोरक्षा कुरुडकर विकास धंदरे संदीप कराडे तेजप्रकाश उईके राकेश कराडे दिनकर कुथे रामू लांजेवार आशिष विश्वास गोलु ठाकरे अर्चना मडावी चेतन हेडावू रंजना गोन्नाडे पुजा लठ्ठे, प्रहार कार्यकर्ते व दिव्यांग बांधव उपस्थित होते. यावेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मानोज उराडे मनोज उराडे यांनी पाठींबा दिला.

या आंदोलनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी अनेक सकारात्मक निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे.