शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी म. रा. शिक्षक परिषदेच्या जिल्हा स्तरीय अधिवेशनाला उपस्थित रहावे –
विभागीय कोषाध्यक्ष तथा जिल्हा पालक संतोष सुरावार
Oo चपराळा येथे म .रा . शि . प .चे ३१ वे जिल्हास्तरीय अधिवेशन
चामोर्शी -महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोलीचे जिल्हास्तरीय अधिवेशन चपराळा येथे घेण्यात येत आहे या अधिवेशनात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या समस्यांबाबत चर्चा होणार त्यासाठी चपराळा येथे ०१ व ०२ जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे
मराशिप तालुका चामोर्शी कडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला नागपूर विभागाचे कोषाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्हा पालक संतोष सुरावार , जिल्हाध्यक्ष अनिल नुतीलकंठावार , जिल्हा कार्यवाह सागर आडे, तालुकाध्यक्ष अतुल सुरजागडे , जिल्हा मार्गदर्शक महेश तुम्पलीवार , धनराज टेंभुर्णे , आनंद दुधे , प्रशांत मुप्पिडवार, दिलीप तायडे , मृणाल तुम्पलीवार , समिक्षा सुरावार व पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते .
या अधिवेशनात अनुदानित, विनाअनुदानित ,कायम विनाअनुदानित प्राथमिक ,माध्यमिक ,उच्च माध्यमिक शाळा , समाज कल्याण अंतर्गत येणाऱ्या खाजगी आश्रम शाळा ,प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी खाजगी आश्रम शाळा संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतरांचे ३१वे जिल्हा अधिवेशन व शिक्षण दरबार दिनांक १ व २ फेब्रुवारी रोजी श्री हनुमान मंदिर प्रशांतधाम परिसर चपराळा आष्टीजवळ तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे संपन्न होणार आहे .
या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना ,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ,आश्वासित प्रगती योजना ,दहा ,वीस ,तीस ,सातव्या वेतन आयोगातील त्रुटी , विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळणे , अतिरिक्त शिक्षक समायोजन इत्यादी विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहेत .
दिनांक १ फेब्रुवारी रोजी विषय – कार्यकर्ता जडण – घडणीचा मुलमंत्र अध्यक्ष तालुका संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नंदकिशोर ओल्लालवार , वक्ते जिल्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यवाह अविनाश तालापल्लीवार ,
रजा नियम – अध्यक्ष जीवन उईके जिल्हा कोषाध्यक्ष , वक्ते – मधुकर मुप्पीडवार उपाध्यक्ष नागपूर विभाग
पेन्शन योजना – अध्यक्ष मनोज बोमनवार जिल्हा उपाध्यक्ष ,वक्ते – नागो गाणार माजी आमदार
तक्रार निवारण – अध्यक्ष – संतोष सुरावार कोषाध्यक्ष नागपूर विभाग , वक्ते – सुभाष गोतमारे कार्यवाह नागपूर विभाग
दि . २ फेब्रुवारी रोजी १ले सत्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण२०२० अध्यक्ष – मृणाल तुम्पलीवार सह महिला आघाडी प्रमुख विभाग नागपूर ,वक्ते – पूजा चौधरी राज्य महिला आघाडी प्रमुख
दुसरे सत्र – उद्घाटन -आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे , अध्यक्ष – अनिल नुतिलकठावार जिल्हा अध्यक्ष गडचिरोली , स्वागताध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळी , प्रमुख मार्गदर्शक आमदार नागो गाणार ,विशेष अतिथी पूजा चौधरी राज्य महिला आघाडी प्रमुख , नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, नागपूर विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे ,नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार , शिक्षक संदेश प्रमुख नागपूर विभाग घनश्याम मनबत्तुलवार ,उपाध्यक्ष नागपूर विभाग विनोद पांढरे , उपाध्यक्ष नागपूर विभाग मधुकर मुपीडवार , संघटन मंत्री नागपूर विभाग रामदास गिरटकर, अध्यक्ष प्राथमिक विभाग नागपूर रंजनाताई कावळे , सह महिला आघाडी प्रमुख नागपूर विभाग मृणाल तुमपल्लीवार , प्रमुख अतिथी जिल्हा कार्यवाह सागर आडे ,जिल्हा अध्यक्ष प्राथमिक विभाग संतोष जोशी , जिल्हा कार्यवाह प्राथमिक विभाग इम्रान पठाण, जिल्हाध्यक्ष जि प विभाग विजय. साळवे ,शिक्षणाधिकारी माध्यमिक वासुदेव भुसे , शिक्षणाधिकारी प्राथमिक बाबासाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे .
तरी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अधिवेशनाला मोठ्या संख्येने शिक्षक बांधवाने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .