एटापल्ली: जिल्हा स्तरीय विजेत्या संघाला मुख्यकार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण
एटापल्ली/ प्रतिनिधी: जिल्हा स्तरीय क्रीडा संमेलन जि .प .मैदान येथे दिनांक 29,30,31 जानेवारी दरम्यान पार पडले .त्यात प्राथमिक मुली कबड्डी मध्ये एटापल्ली संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले .एटापल्ली येथील सूरजागड केंद्रातील हा संघ असून त्या संघाने अतुलनीय कामगिरी करत सर्व सामने जिंकले आणि शेवटच्या सामन्यात कुरखेडा संघाला धूळ चारत प्रथम क्रमांक मिळविला.मुख्यकार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या वेळी हृषीकेश बुरडकर गटशिक्षणाधिकारी एटापल्ली आणि निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी संघाला शुभेच्छा दिल्या. संघाला मोलाचे मार्गदर्शन केंद्रप्रमुख सूरजागड तेजराज नंदगिरवार,मुख्याध्यापिका गोंगले परसलगोंदी,बाजीराव मडावी सह.शिक्षक परसलगोंदी,मीरगु उसेंडी सह शिक्षक,रुपेश घुबडे,मारोती सडमेक सहशिक्षक परसलगोंदी य़ा सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले